esakal | मुंबई : दहा पुलांवर भार नको
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई : दहा पुलांवर भार नको

मुंबई : दहा पुलांवर भार नको

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : दक्षिण मुंबईतील रेल्वेवरील आठ पुलांसह उपनगरातील दोन पुल कमकवुत असल्याने जास्त भार आल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. यातील काही पुलांची दुरुस्ती सुरु असून काही पुल वाहतुकीसाठी मर्यादित स्वरुपात सुरु आहेत. या पुलांवर गणेशोत्सवात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलांवरून गणेश मूर्तीचे आगमन किंवा विसर्जन करताना गर्दी करू नये, लाऊडस्पिकरचा वापर करू नये आणि पुलावर जास्त वेळ थांबू नये असे निर्देश पालिकेने दिले आहे.

हेही वाचा: Dombivli : निर्माल्यात टाकले जातेय जुने कपडे, प्लास्टिक..

या धोकादायक पुलांमध्ये अंधेरी येथील गोखले पुलाचाही समवेश आहे. या 2018 मध्ये या पुलाची पादचारी मार्गिका रेल्वे मार्गावर कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. या पुलाचाही या यादीत समावेश आहे. गोखले पुल त्यानंतर फोर्ट येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर महानगर पालिकेने मुंबईतील 350 पुलांचे नव्याने स्टँक्चरल ऑडीट केले. या ऑडीटनुसार काही पुल वाहतुकीसाठी बंद करुन त्यांची दुरुस्ती व पुनर्बांधणी सुरु करण्यात आली आहे.

तर,काही मर्यादित स्वरुपात वाहतुकीसाठी सुरु असून टप्प्या टप्प्याने दुरुस्ती केली जात आहे. त्यातील 10 पुलांवर गणपती आगमन आणि विसर्जन काळात गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीमुळे पुलावर भार आल्यास दुर्घटना घडू शकते. त्यामुळे या गर्दी करु नये असे आवाहन महानगर पालिकेने केले आहे.

हेही वाचा: काळजी घ्या, फेरीवाल्यांचे काय ते आम्ही बघून घेऊ - राज ठाकरे

१६ टनांपेक्षा जादा भार नका

सलग दुसर्‍या वर्षी गणपतीच्या आगमन-विसर्जन मिरवणुकीवर बंदी असली तरी लालबाग-परळ अशा दक्षिण मध्य भागातून निघणार्‍या सार्वजनिक गणपतींच्या आगमन-विसर्जनाच्या वेळी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे महापालिकेने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.पुलावर १६ टनांपेक्षा जादा भार पडणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहनही पालिकेने केले आहे.त्याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेवरील

- घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रीज

- करीरोड रेल्वे ओव्हर ब्रीज

- आर्थर रोड-चिंचपोकळी रेल्वे ओव्हर ब्रीज

- भायखळा रेल्वे ओव्हर ब्रीज

पश्चिम रेल्वेवरील

- मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रीज

- सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रीज

- फ्रेंच रेल ओव्हर ब्रीज ग्रॅन्टरोड

- केनडी रेल ओव्हर ब्रीज ग्रॅन्टरोड

- फॉल्कलॅंड रेल्वे ओव्हर ब्रीज मुंबई सेंट्रल

- बेलासीस मुंबई सेंट्रल जवळील ब्रीज

- महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रीज

- प्रभादेवी-कॅरोल रेल ओव्हर ब्रीज

- दादर - टिळक रेल ओव्हर ब्रीज

- अंधेरी स्टेशनजवळील गोखले रेल्वे ब्रीज

loading image
go to top