esakal | मुंबईत लग्न समारंभ सुरू असतानाच पडली धाड अन्...

बोलून बातमी शोधा

BMC-Raid

मुंबईच्या हॉलमध्ये विवाहसोहळा सुरू होता. त्यावेळी अचानक तेथे अधिकारी पोहोचले.

मुंबईत लग्न समारंभ सुरू असतानाच पडली धाड अन्...
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: सध्या सर्वत्र कोरोनासंबंधीचे निर्बंध लागू आहेत. अशा परिस्थितीत दक्षिण मुंबईतील एका बँक्वेट हॉलच्या व्यवस्थापनाला तब्बल ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शुक्रवारी ही घटना घडली. या बँक्वेट हॉलमध्ये लग्न समारंभाचे आयोजन करताना कोरोनासंबंधित नियमांचे उल्लंघन करण्यात आलं. त्यामुळे नवरदेव आणि वधूच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात या कारवाई बद्दलची अधिक माहिती देण्यात आली. मुंबईच्या बाबुलनाथ परिसरात असलेल्या एका बँक्वेट हॉलने सध्या लागू असलेले 'ब्रेक द चेन' नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. 'ब्रेक द चेन'ची नियमावली १५ मे पर्यंत लागू असतानाही ते नियम न पाळल्याने वर आणि वधूच्या कुटुंबीयांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: मुंबईकरांनो लक्ष द्या! लॉकडाउन गाईडलाईन्सचा 'हा' मेसेज करू नका फॉरवर्ड

सध्या राज्यात असलेल्या कोरोनाच्या ब्रेक द चेन नियमावली अंतर्गत लग्नासाठी एकूण २५ पाहुण्यांनाचा उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, लग्नाचे सर्व विधी हे दोन तासांतच आटोपण्यास सांगण्यात आले आहे. या नियमांचा भंग केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: 'ब्लेम गेम मध्ये जनतेचाच गेम होतोय', मनसेचा निशाणा

"मुंबईच्या त्या बँक्वेट हॉलमध्ये अंदाजे १५० लोक लग्नासाठी उपस्थित होते. आम्हाला या लग्न समारंभाबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या डी वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी त्या हॉलवर धाड टाकली. त्यावेळी तेथे २५ पेक्षा जास्त पाहुणे तर हजर होतेच पण त्याचसोबत सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाल्याचं दिसून आलं. त्यामुळे गावदेवी पोलिस ठाण्यात नवरदेव आणि वधूच्या कुटुंबीयांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे", अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.