

मुंबई, ता. ११ : मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास सुकर करणाऱ्या दोन मोठ्या घोषणा शुक्रवारी (ता. ११) करण्यात आल्या आहेत. मुंबईकरांच्या सेवेत २३८ एसी लोकल लवकरच दाखल होणार असल्याची घोषणा शुक्रवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई वन कार्ड’ हे मल्टीमोडल स्मार्ट कार्ड महिनाभरात प्रवाशांना उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. रेल्वेमंत्री वैष्णव आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह महाराष्ट्रातील मंजुरी मिळालेल्या विविध रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली.