मुंबई : पुढील सात दिवस रात्रीच्या वेळी प्रवासी आरक्षण प्रणाली बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

मुंबई : पुढील सात दिवस रात्रीच्या वेळी प्रवासी आरक्षण प्रणाली बंद

मुंबई : कोरोना पूर्वीप्रमाणे गाड्यांचे क्रमांक, तिकीट शुल्क करण्यासाठी 14 नोव्हेंबरपासून ते 20-21 नोव्हेंबरपर्यंत रात्री 11.30 वाजेपासून ते पहाटे 5.30 पर्यंत या 6 तासांच्या कालावधीत कोणत्याही प्रवासी आरक्षण प्रणाली सेवा उपलब्ध नसेल. तिकीट आरक्षण, वर्तमान बुकिंग, रद्द करणे, चौकशी सेवा उपलब्ध नसणार, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

प्रवासी सेवा सामान्य करण्याच्या आणि टप्प्याटप्प्याने कोरोना स्तरावर परत येण्याच्या रेल्वेच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, रेल्वेची प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) पुढील 7 दिवसांसाठी रात्रीच्या वेळी 6 तासांसाठी बंद केली जाईल. सिस्टीम डेटाचेअपग्रेडेशन आणि नवीन ट्रेन नंबरचे अपडेटसाठी सक्षम करण्यासाठी हे काम केले जाणार आहे. सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रचंड प्रमाणात मागील काळातील जुन्या ट्रेन क्रमांक आणि वर्तमान प्रवासी बुकिंग डेटा अद्ययावत केला जाणार आहे. तिकीट सेवांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी काळजीपूर्वक कॅलिब्रेट केलेल्या टप्प्यात आणि रात्रीच्या वेळी अंमलात आणल्या जातील.

हेही वाचा: पुण्यात बनवला चॉकलेटचा किल्ला; चॉकलेट फटाके ही उपलब्ध

या कालावधीत रेल्वे कर्मचारी, प्रभावित वेळेत सुटणाऱ्या गाड्यांचे आगाऊ चार्टिंग सुनिश्चित करतील. प्रवासी आरक्षण प्रणाली सेवा वगळता, 139 सेवांसह इतर सर्व चौकशी सेवा सुरू राहतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

loading image
go to top