मुंबई : कारागृहात शिक्षण घेण्यास परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prison

मुंबई : कारागृहात शिक्षण घेण्यास परवानगी

मुंबई: कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावलेल्या दोन आरोपींना येरवडा कारागृहात शिक्षण घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली. न्यायालयाने आरोपींच्या या मागणीचे स्वागत केले.

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर २०१६ मध्ये बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी आरोपी जितेंद्र शिंदे आणि नितीन भैलुमे यांना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. सध्या दोघेही पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. दोन्ही आरोपींनी फाशीच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील याचिका केली आहे, तसेच राज्य सरकारनेही फाशीची शिक्षा कायम ठेवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका केली. दरम्यान, कारागृहात आम्हाला शिक्षण पूर्ण करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी दोन्ही आरोपींनी केली होती.

आरोपींची इच्छा स्वागतार्ह!

कारागृहात शिक्षा भोगत असताना आरोपींनी व्यक्त केलेली शिक्षणाची इच्छा स्वागतार्ह आहे. त्यामुळे माणुसकीच्या दृष्टिकोनातून कारागृह प्रशासनाने कार्यवाही करावी, असे आदेश खंडपीठाने दिले.

Web Title: Mumbai Permission Study Prisons

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top