
मुंबईत एका व्यक्तीनं पिटबुल जातीचा कुत्रा ११ वर्षीय मुलावर सोडला. या कुत्र्यानं मुलाला चावाही घेतला. कुत्रा चिमुकल्या मुलाला चावत असताना त्याचा मालक मात्र हसत हसत सगळं बघत होता. कुत्र्याच्या हल्ल्यात ११ वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. या प्रकरणी पिटबुल कुत्र्याच्या मालकाला अटक करण्यात आलीय. य़ा घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.