Crime News : मुंबईत विमान प्रवासाच्या बनावट तिकिटांची विक्री; आरोपी अटकेत

मुंबईत टूर्सच्या नावाने विमान प्रवासाच्या बनावट तिकिटांच्या विक्री पाहायला मिळत आहे.
Crime News
Crime Newsesakal
Summary

मुंबईत टूर्सच्या नावाने विमान प्रवासाच्या बनावट तिकिटांच्या विक्री पाहायला मिळत आहे.

मुंबई - मुंबईत टूर्सच्या नावाने विमान प्रवासाच्या बनावट तिकिटांच्या विक्री पाहायला मिळत आहे. अशाच एका प्रकरणात मुंबईतील माहीम येथील एक टूर्स आणि ट्रॅव्हल ऑपरेटर अभिषेक कोटवालला अटक केली. या प्रसंगी बनावट तिकीट विक्रीचे रॅकेट असल्याचा पोलिसाना संशय असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. पैसे स्वीकारल्यानंतर आपल्या ग्राहकांना विमान प्रवासाची बनावट तिकिटे विकून फसवणूक केल्याचा कोटवालवर आरोप आहे. ट्रॅव्हल एजंटने फसवणूक केलेल्या व्यक्तीना विमानतळावर पोहोचल्यावर बनावट तिकिटे असल्याचे लक्षात आले.

फसवणुकीच्या तक्रारीनंतर शिवाजी पार्क पोलिसांनी पुष्पम हॉलिडेज अँड टूर्स आणि समर्थ हॉलिडेज टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालवणाऱ्या अभिषेक कोतवाल यांच्यावर शिवाजी पार्क आणि गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लंडनमधील रहिवासी 35 वर्षीय निखिल धानिया यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पिडीत निखिल धनिया यांनी लंडन ते नवी दिल्ली या मार्गांच्या विमान प्रवासासाठी आरोपी अभिषेक कोतवालला पैसे देऊनही तिकीट न मिळाल्याने त्याला तिकीट मिळाले नाही.

सप्टेंबर 2022 मध्ये कोतवालला लंडन ते नवी दिल्ली या परतीच्या फ्लाइटची दोन तिकिटे बुक करण्यासाठी 1.85 लाख दिले होते. पिडीत व्यक्तीने आरोपी कोटवाला ला 27 डिसेंबरचे तिकीट बुक करण्यास सांगितले होते आणि अनेक वेळा आठवण करून दिली होती.तथापि, आरोपीने 18 डिसेंबरला तिकीट बुक करण्याचे आश्वासन दिले. परंतु आरोपीने तिकिटे बुक केली नाहीत.शेवटी, फसवणूक झाल्याचे लक्षात येता कोतवालविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठीच निखिल धनीया मुंबईत आले.

निखिल धनिया यांचा लंडनस्थित मित्र अमित उपाध्याय यांची सुद्धा कोटवालने फसवणूक केल्याचे समोर आले. अमित उपाध्यायने ऑगस्टमध्ये आरोपीला 1.34 लाख दिले होते, उपाध्याय यांनी डिसेंबरमध्ये भारताला भेट देण्याची योजना आखली होती. आरोपीने त्यांना तिकिटे दिली. परंतु जेव्हा त्यांचे मित्र आणि त्याचे कुटुंब हिथ्रो विमानतळावर पोहोचले तेथे त्यांना तिकिटे बनावट असल्याची माहिती मिळाली.

उपाध्याय यांनी कोटवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना विमानतळाजवळील हॉटेलमध्ये राहण्यास सांगण्यात आले असून, नवीन तिकिटे बुक केली जातील असे आश्वासन दिले. परंतु ना कोतवालने तिकिटे बुक केली, ना हॉटेलचे बिल भरले. सुरुवातीला भरलेल्या पैशांव्यतिरिक्त, फक्त नवीन तिकिटे बुक करण्यासाठी उपध्यायाय यांचे 10 लाखांचे नुकसान झाले आहे,पोलिसांच्या माहितीनुसार कोट वलने अनिल छाब्रिया 1.99 लाख, दीपांशू थिंग्रा 30000, पुनित गुप्ता 5.54 लाख, नमन सहगल 1.96 लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रसंगी मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com