esakal | रात्री दिसायचं नाही म्हणून दिवसा करायचा चोऱ्या
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai police

रात्री दिसायचं नाही म्हणून दिवसा करायचा चोऱ्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईच्या (mumbai) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या आरोपीची खासियत म्हणजे ते दिवसा नागरिकाच्या डोळ्या देखत चोर्या करायचे आणि समोरच्याला कळायचं देखील नाही. या मागचं कारण म्हणजे यातील मुख्य आरोपी हा रातअंधळा होता. रात्री दिसायचं नाही म्हणून दिवसा चोऱ्या करायचा. मागील अनेक दिवसांपासून पोलिस या आरोपींच्या मागावर होते. अखेर वाकोला पोलिसांनी या तिघांचा पर्दाफाश करत, त्यांना बेड्या ठोकल्या.

धारावी परिसरात राहणार्या करामत अलीला काही दिवसापूर्वी एका चोरीच्या गुन्ह्यात वाकोला पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्हा कबूली न करणाऱ्या करामत अलीला पोलिसांच्या सच बोल पट्यानं बोलतं केलं आणि इतर दोन आरोपी म्हणजेच राकेश खरटमोल आणि रोहित राठोड यांची नावे समोर आली. पोलिसांनी मोठ्या शिताफिने या दोघांना अटक केली. चौकशीत हे आरोपी करामत हा रात अंधळा असल्याने दिवसाढवळ्या चोरी करत असल्याची कबूली दिल्याने पोलिसांच्या भूवया ही उंचावल्या....मग काय उगाच आव्हान दिल्यावर कुणीच गप्प बसत नाही.

हेही वाचा: घरमालक-भाडेकरूंच्या तंट्यात वाढ

पोलिस तपासात या आरोपीवर विविध पोलिस ठाण्यात ३५ गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले. चोरी करण्यासाठी सर्वात तीक्ष हत्यार म्हणून गाडयांचे नटबोल्ट आवळयासाठ वापरला जाणारा पोपट पाना सोबत ठेवायचे. झोपडपट्टी परिसरातचहे आरोपी चोर्या करायचे. या आरोपीकडून पोलिसांनी आतापर्यंत ८ लाखांचं सोनं हस्तगत केलं आहे. चोरी केलेलं सोनं हेआरोपी पत्नीकडे अहमदाबादला पाठवायचे, पत्नी तिकडे नवर्यासोबत पटत नसल्यानं उदर निर्वाहासाठी सोनं विकत असल्याचं भासवून आरोपींना मदत करत असल्याचे प्राथमिक आरोपींच्या चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

-सूरज सावंत

loading image
go to top