esakal | घरमालक-भाडेकरूंच्या तंट्यात वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

घरमालक-भाडेकरूंच्या तंट्यात वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशी : टाळेबंदीमुळे व्यवसाय (Business) ठप्प झाल्याने अनेकांनी आपले गाव गाठल्याने घरमालक हवालदिल झाले आहेत. घरमालकांना (House Owner) भाडेकरूच मिळत नसल्याने घरांचे भाडे कमी झाले आहे. तर अनेक ठिकाणी घरमालक (Owner) व भाडेकरू यांच्यातील वाद थेट पोलिस (Police Station) ठाण्यापर्यंत पोहचत आहेत.

नवी मुंबईत पूर्वी भाड्याने घर घेण्यासाठी एजंटला गाठणे त्याच्यासमवेत अनेक घरे पाहणे, भाडे वा अनामत रक्कम कमी करण्यास घरमालकांची मिन्नतवारी करणे शेवटी दीड ते दोन भाडे एजंटला देत घर भाडय़ाने घ्यावे लागत होते. या शिवाय अकरा महिन्यांचा करार संपताच दुसरे घर पाहणे अथवा १० टक्के भाडेवाढ सहन करीत पुन्हा एजंटला एक महिन्याचे भाडे दलाली म्हणून द्याावे लागत होते. आता मात्र करोनामुळे हे चित्र पालटले असून भाडेकरू राजा झाला आहे.

हेही वाचा: पुण्यात विद्यार्थी-घरमालक वाद शिगेला; साहित्य बाहेर फेकून देण्याचे प्रकार

नवी मुंबईत बहुतांश ठिकाणी दोन ते अगदी दहा हजारपर्यत भाडे कमी झाले आहे. याच कारणांनी अनेक ठिकाणी भाडेकरू घर सोडत असेल तर घरमालकांनी नवा नियम काढला आहे. जो भाडेकरूंना डोकेदुखी ठरत आहे. करारापूर्वी घर सोडायचे असल्यास भाडेकरूला एक महिना अगोदर एजंट व घरमालकाला सूचना द्यावी लागते. त्यानंतर घरमालक भाडेकरूंची अनामत रक्कम देत असे, मात्र आता एक महिन्याची नोटीस दिली तरी भाडेकरूंचाच तुटवडा झाल्याने नवीन भाडेकरू आल्यावरच तुमची अनामत रक्कम मिळेल असा अजब नियम अनेक घरमालकांनी राबवणे सुरू केल्याने एजंटसुद्धा कात्रीत अडकले आहेत. या शिवाय अनेक ठिकाणी भाडेकरूंची अनामत रक्कम संपूनही भाडेकरू घर सोडत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

हेही वाचा: पूरग्रस्तांना भरपाईसाठी विमा कंपन्यांनी टाळाटाळ केल्यास कडक कारवाई करा

घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वादाच्या तक्रारी वाढत आहेत. यात अनामत रक्कम देण्यास टाळाटाळ करणे, वा भाडेकरूने घराचा ताबा न सोडणे, घराचा देखभाल दुरुस्ती खर्च कोणी देणे असे विषय असतात.

- सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त

loading image
go to top