मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 16 कोटींच्या ड्रग्जसह तिघांना अटक

अँटॉप हिल परिसरात ड्रग्ज विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली होती.
Drug
DrugSakal

मुंबई : मुंबई क्राइम ब्रँच युनिट 1 (Mumbai Crime Branch Unit 1) ने 16 कोटी 10 लाख रुपये किमंतीचे मेथाक्लॉन ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा तस्करांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, या सर्वांना अटक केली आहे. (Mumbai Crime Branch Unit 1 seized methaclone drugs )

Drug
हाडांमध्ये लपलाय ओमिक्रॉनला हरवण्याचा उपाय!

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात (Police Arrested Three smugglers in Mumbai) 3 जण ड्रग्ज (Drug Sale) विक्रीसाठी येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती, त्यानंतर पूर्व माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने (Crime Branch) त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत 16 किलो 100 ग्रॅम मेथाक्‍लोन (methaclone drugs) सापडले, ज्याची किंमत 16 कोटी दहा लाख रुपये आहे. पोलिसांनी 3 आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com