आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर शाहरूख खान करतोय शूटिंग?

शाहरूख खानचा एक फोटो इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहे
shahrukh khan
shahrukh khan shahrukh khan

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचे (Aryan Khan drug case) नाव आल्याने गेले काही दिवस शाहरूख खान (Shahrukh Khan) आणि कुटुंबासाठी अडचणीचे होते. मात्र, आता त्याचे आयुष्य पूर्वीसारखे रुळावर आले आहे. तब्बल तीन महिन्यांनंतर शाहरूख शूटिंग सेटवर (Shooting begins) दिसला आहे. शूटिंग सेटवरील अभिनेत्याचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो ‘किंग खान’च्या लूकमध्ये दिसत आहे.

शाहरूख खानचा एक फोटो इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाहरूख बॉडीगार्डसोबत शूटिंगसाठी जाताना दिसत आहे. यावेळी तो काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि चष्मा घातलेला दिसतो. मागे केस बांधलेल्या फोटोमध्ये त्याची मागची बाजू अधिक दिसते. अभिनेत्याचा हा फोटो त्याच्या फॅन क्लबवर शेअर करण्यात आला आहे.

shahrukh khan
UPTET 2021 Exam : पेपरफुटीनंतर परीक्षेची नवीन तारीख जाहीर

या व्हायरल छायाचित्राबाबत तर्कवितर्क लावले जात असताना शाहरूख खानने त्याच्या पठाण चित्रपटासाठी शूटिंग केले आहे, तर काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की तो एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी आला होता. मात्र, याबाबत अद्याप कोणत्याही अभिनेत्याकडून किंवा चित्रपट निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, शाहरूखचा (Shahrukh Khan) फोटो पाहिल्यानंतर त्याचे चाहते नक्कीच खूश झाले आहेत.

पठाणचे चित्रीकरण स्पेनमध्ये होणार होते

पठाण चित्रपटाची शूटिंग ऑक्टोबरमध्ये स्पेनमध्ये होणार होती. परंतु, आर्यन खानच्या अटकेनंतर ती रद्द करण्यात आली. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, पठाणचे शूट (Shooting begins) आता पुन्हा सुरू झाले आहे. या चित्रपटात शाहरूख खानसोबत (Shahrukh Khan) दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शाहरूख खान या चित्रपटात दमदार ॲक्शन करताना दिसणार आहे.

shahrukh khan
महाविकास आघाडीचे भवितव्य धोक्यात; पटोले विरुद्ध पटेल यांच्यात सामना

चार वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन

काही काळापूर्वी या चित्रपटाच्या शूटिंगच्या क्लिप सोशल मीडियावर खूप व्हायरल झाल्या होत्या. या चित्रपटाद्वारे शाहरूख चार वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करीत आहे. डिसेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ चित्रपटात शाहरूख खान शेवटचा दिसला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com