Mumbai - बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Currency

मुंबई - बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश; एकाला अटक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा गुप्तवार्ता विभागाने पायधुनी परिसरात सुरू असलेला भारतीय नोटा छापण्याचा कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारखान्यातून पोलिसांनी १ लाख ६० हजाराच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी गुप्तवार्ता विभागाने शब्बीर हासम कुरेशी या ४७ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.

शब्बीरच्या घरातून पोलिसांनी एक संगणक प्रिंटर आणि बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त केले आहेत. पायधुनीच्या करिमी मंजील, नारायण ध्रुत स्ट्रीट येथेआरोपी रहात असून राहत्या घरीच तो या नोटा छापत होता. मागील अनेक दिवसापासून तो या नोटा छापत असून मुंबईच्या विविध बाजार पेठेत त्याने त्या वितरित केल्या आहेत.

हेही वाचा: पहिली ते चौथी शाळा सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी

या प्रकरणी पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून शब्बीरला अटक केली असून त्याचा साथीदार याचा शोध पोलिस घेत आहेत. शब्बीरवर यापूर्वीही एनडीपीएस अँक्ट अंतर्गत पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.

loading image
go to top