esakal | मनसे-भाजप युतीबद्दल देवेंद्र फडणवीसांनी सोडलं मौन, म्हणालेत..
sakal

बोलून बातमी शोधा

मनसे-भाजप युतीबद्दल देवेंद्र फडणवीसांनी सोडलं मौन, म्हणालेत..

मनसे-भाजप युतीबद्दल देवेंद्र फडणवीसांनी सोडलं मौन, म्हणालेत..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकताच आपला झेंडा बदलण्याचा निर्णय घेतलाय. अशात लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना देखील राजकारणात सक्रिय करणार आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे ती महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप एकत्रित येणार का? त्याला कारणही तसेच आहे. सर्वात आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर यांनी केलेलं सूचक विधान आणि त्यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट, यामुळे या राज्यातील नव्या राजकीय समीकरणांची चाहूल लागतेय. 

मोठी बातमी - ​'मनसे'चा मोठा चेहरा आता येणार जनतेसमोर, मनसेत आनंदी आनंद..

शिवसेनेने भाजासोबत ब्रेकप केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केलाय. अशात भाजपचा हिंदुत्त्ववादी मित्र शिवसेनेची पोकळी भरून काढण्यासाठी भाजप हिंदुत्त्ववादी विचारधारेच्या मनसे सोबत हातमिळवणी करू शकते असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. महाराष्ट्र नवनिर्माणसेनेला देखील भाजपसोबत जाऊन फायदा होऊ शकतो असं देखील बोललं जातंय. यामुळे राज्यात नवीन राजकीय गाठी बांधल्या जाऊ शकतात असं बोलायला वाव उरतो. 

मोठी बातमी - दहा मिनिटांचं मौन आंदोलन आणि दीपिकाचा मास्टरस्ट्रोक...

मात्र यामध्ये सर्वात मोठा प्रश्न उतरतो तो म्हणजे राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांसोबत भेट झाली का? आणि झाली तर काय चर्चा झाली? यावर महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उत्तर दिलंय . सध्यातरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित येण्याची काही चिन्ह नाहीत. कारण त्यांच्या आणि आमच्या विचारात अंतर आहे. जोपर्यंत विचारात अंतर आहे, कार्यपद्धतीत अंतर आहे, तोपर्यंत आम्ही एकत्र येऊ शकत नाही. भविष्यात त्यांची भूमिका बदलणार असेल, ते का नव्या विचारांनी चालणारे असतील, ते व्यापक विचाराने चालणार असतील तर त्यावेळेच्या परिस्थितीत त्याचा विचार केला जाईल. आज तरी आमची युती होईल असं मला वाटत नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. 

मोठी बातमी - शेतकरी कर्जमाफीवर राज्यपाल कोश्यारी म्हणतात...

असं बोलतात राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. त्याचाच प्रत्यय देवेंद्र फडणवीसांच्या उत्तरावरून येताना पाहायला मितोय. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात कोणतं नवीन राजकीय गणित पाहायला मिळणार का? याचीच सर्वांना उत्सुकता आहे. 

opposition leader devendra fadanavis on alliance with raj thackerays MNS in maharashtra