
मुंबईकरांचा आवाज थेट पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. ५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या जनता दरबारात दर मंगळवारी, मुंबईकर कोणत्याही पूर्वपरवानगी किंवा अपॉइंटमेंटशिवाय थेट पोलीस आयुक्तांना भेटू शकतील. त्यांच्या समस्या मांडू शकतील आणि त्यांचे निराकरण होण्याची अपेक्षा करू शकतील.