esakal | TRP घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी 12 आरोपींविरोधात दाखल केलं 1400 पानी आरोपपत्र
sakal

बोलून बातमी शोधा

TRP घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी 12 आरोपींविरोधात दाखल केलं 1400 पानी आरोपपत्र

टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट म्हणजेच TRP गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज (मंगळवारी) आरोपपत्र दाखल केले.

TRP घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी 12 आरोपींविरोधात दाखल केलं 1400 पानी आरोपपत्र

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट म्हणजेच TRP गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज (मंगळवारी) आरोपपत्र दाखल केले. याप्रकरणी 12 आरोपींविरोधात तब्बल 1400 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

TRP घोटाळा प्रकरणात भादंवि कलम 409, 420, 465, 468, 406, 120(ब), 201, 204, 212 व 34 अंतर्गत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी उर्वरीत आरोपींवर पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येईल.

महत्त्वाची बातमी : "कुणीही पॅनिक होऊ नका"; लॉकडाऊनबाबत स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

भारत ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल (BARC) ही संस्था भारतीय माहिती व प्रसारण मंत्रालय (MIB ) तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) यांच्या अधिपत्याखाली काम करते. ही संस्था दावा करते की, ते 32 हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या भारतीय टीव्हीवरील जाहिराती उद्योगाला उपयुक्त माहिती पुरविते. या संस्थेने संपूर्ण भारतातील विविध ठिकाणी जवळपास 3 हजार बॅरोमीटर्स बसवले असून त्याद्वारे प्रेक्षकांनी पाहिलेल्या पाहिलेल्या कार्यक्रमांवर निगराणी ठेवली जाते व त्याद्वारे विविध चॅनेल्सना रेटींग दिले जाते.

'ते' 12 जण कोण ? 

हरिष पाटील, दिनेश विश्वकर्मा व रामजी वर्मा ,  हंसा कंपनीचा विशाल वेद भंडारी , अंधेरीतील बोमपेली नारायण मिस्त्री , बॉक्स सिनेमाचे नारायण नंदकिशोर शर्मा , फक्त मराठीचे शिरीष सतीश पत्तनशेट्टी आणि उत्तर प्रदेशमधून विनय त्रिपाठी, अभिषेक कोलावडे, उमेश मिश्रा आदी  12 जणांना अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी :  "आता नको वादावादी, आता फक्त राष्ट्रवादी" म्हणत भाजपचा बडा नेता राष्ट्रवादीत ! 

BARC ने दिलेल्या रेटिंग्जनुसार जाहिरातदार जाहिरात प्रसारित करणाऱ्यांना पैसे देतात. TRP मध्ये फेरफार करून फसवणूक केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम लक्ष केलेल्या चॅनेल्सना होतो आणि अशा प्रकारे फेरफार करून टीआरपी वाढवल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. याप्रकरणी तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आतापर्यंत 140 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. 

( संपादन - सुमित बागुल )

Mumbai police files 1400 pages chargesheet in fake television ratings points case

loading image
go to top