

Mumbai traffic advisory for Lionel Messi event
ESakal
मुंबई : फुटबॉलचा जादूगार आणि अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) "GOAT इंडिया टूर 2025" निमित्त सध्या भारत दौऱ्यावर आहे. मेस्सीच्या या भारत दौऱ्यात कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली या शहरांचा समावेश आहे. आज शनिवार (ता. १३) रोजी लिओनेल मेस्सी कोलकाता येथे असून रविवार (ता. १४) रोजी मुंबईत हजेरी लावणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.