मुंबई : प्रवासी म्हणून रिक्षात बसुन लुटणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : प्रवासी म्हणून रिक्षात बसुन लुटणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : प्रवासी म्हणून रिक्षात बसल्यानंतर काही अंतरावर जाऊन ड्रायव्हरला जखमी करुन त्यंना लुटणाऱ्या टोळाला वालीव पोलिसांनी अटक केलीय आहे. ऑगस्ट 2021 मध्ये अका रिक्षा चाालकानं तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दोन महिन्यांनंतर पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलं आहे. शेर-रजॉ साजीद खान पठाण आणि राहील साजीद खान अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत.

त्यांच्यावर दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. एका प्रकरणात भा द वि. कलम 394 आणि 34 अंतर्गत तर दुसऱ्या प्रकरणात भा द वि कलम 392 आणि 34 अतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऑगस्ट 2021 मध्ये मिरारोडहुन वसईला जाण्यासाठी हायवेवरुन दोन व्यक्तींनी रिक्षा केली होती, थोडं पुढे गेल्यावर त्यातल्या एकानं ड्रायव्हरला पकडून छातीवर ब्लेडनं वार केले, आणि त्यांच्याकडे असलेला मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन पळून गेले होते.

हेही वाचा: 'आपण असहिष्णू आणि दुटप्पी'; कॉमेडियन वीरदासच्या समर्थनार्थ उतरले सिब्बल आणि थरुर

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्यानं दोन महिने तपास करुन दोन जणांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून त्यांनी याआधीही असंच एका व्यक्तीला लुटल्याची माहीती समोर आली. त्याही प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. दोघांकडून 13 हजार रुपयांचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

loading image
go to top