esakal | BKC येथील केंद्रावरुन पोलिसांनी लस लाभार्थ्यांना पाठवले माघारी

बोलून बातमी शोधा

At bkc vaccination center
BKC येथील केंद्रावरुन पोलिसांनी लस लाभार्थ्यांना पाठवले माघारी
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: आजपासून देशात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसींचा तुटवडा असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने १८ ते ४४ वयोगटासाठी फक्त पाच निवडक केंद्रावरच लसीकरण होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दुपारी १ ते संध्याकाळी ६ या वेळेतच लसीकरण होईल. आधी नोंदणीकरुन वेळ घेतलेल्यांचे लसीकरण होईल, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांनी शनिवारी बीकेसीमध्ये उभारण्यात आलेल्या जम्बो लसीकरण केंद्रावरुन काही लाभार्थ्यांना माघारी पाठवले. अजून इथे कोणी आलेले नाही. आम्हाला आज लस मिळणार नाही, असे एका लाभार्थीने सांगितले. मला दुपारची वेळ दिली आहे. पण मी त्याआधीच आलो असे दुसऱ्या लस लाभार्थीने सांगितले.

हेही वाचा: मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट होतेय, पण...

"तुम्हाला फोनवर लसीकरणाचा संदेश आला असेल, तरच तुम्ही लसीकरण केंद्रावर जा" असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. "कोविन वर नोंदणी करणाऱ्यांना मेसेज येईल, ते लसीकरणासाठी जाऊ शकतात. पण मेसेज येत नाही, तोपर्यंत तिथे जाऊ नका" असे सांगण्यात आले. "तुम्ही नोंदणी केलीय पण तुम्हाला मेसेज आलेले नाही, तर लसीकरण केंद्रावर जाऊ नका" असे पेडणेकर म्हणाल्या.

हेही वाचा: मुंबईकरांनो लक्ष द्या! लॉकडाउन गाईडलाईन्सचा 'हा' मेसेज करू नका फॉरवर्ड

लसीच्या दुसऱ्या डोससाठी येणाऱ्या ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येईल, असे पेडणेकर यांनी स्पष्ट केले. लसींची मात्रा कमी असल्यामुळे लसीकरणात वारंवार खंड आणि अडथळे येत आहेत.