

Manoj Jarange Summons
ESakal
मुंबई पोलिसांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना समन्स बजावले आहे. त्यांना सोमवारी (१० नोव्हेंबर) सकाळी ११ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान आझाद मैदान पोलीस स्टेशनमधील तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. नोटीसच्या प्रतीवर आझाद मैदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश आव्हाड यांची स्वाक्षरी आहे.