उद्धव ठाकरेंसह राज्यातील मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह ट्वीट करणं चांगलंच भोवलं, तुम्हीही असे लिखाण करत असाल तर...

अनिश पाटील
Wednesday, 15 July 2020

संबंधीत ट्वीटर अकाउंट फार ऍक्टिव्ह असून दररोज अनेक ट्वीट त्यावरून करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंसह राज्यातील महाविकास आघाडीच्या विविध मंत्र्यांबाबत आक्षेपार्ह ट्वीट, तसेच शिवीगाळ केल्याप्रकरणी व्हीपी रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  शिवसेनेचा कायदेशिर सल्लागार असलेल्या धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीवरून माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठी बातमी - 'त्या' आल्या अन् मिळाला थेट जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा बहुमान; वाचा सविस्तर...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची छायाचित्र ट्वीट करून त्याखाली आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला आहे. तसेच शिवीगाळही केली आहे. समित ठक्कर नावाने हे ट्वीटर अकाउंट आहे. त्यावरून मंत्र्यांबद्दल करण्यात आलेल्या सहा ट्वीटबाबत तक्रार करण्यात आली आहेत. त्यात शिवीगाळ करून मंत्र्यांची प्रतिमा मलीन करण्यात आल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणी भादंवि कलम 292, 500 व माहिती तंत्रज्ञान गैरवापर कायदा कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखळ करण्यात आला असून पलिस अधिक तपास करत आहेत.

मोठी बातमी - कोरोनामध्ये मृत्यू नको रे बाबा! डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणि रुग्णवाहिकेसाठी नातेवाईकांची फरफट...

1 जुलैला ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या बद्दल ट्वीट करताना आरोपीने शिवीगाळ गेली आहे. याशिवाय 30 जून व 1 जुलैमध्येही संबंधीत ट्वीटर अकाउंटवरून आदित्य ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबतही 1 जूनला या ट्वीटर अकाऊंटवरून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये त्यांना आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आले आहे. मिश्रा यांनी हे सर्व ट्वीट पाहिल्यानंतर याबाबत व्हीपी रोड पोलिसांकडे याबाबत रितसर तत्कार केली. तक्रारीमध्ये संबंधीत ट्वीटर अकाउंटवरून करण्यात आलेल्या आक्षेपाह्र ट्वीटचे स्क्रीनशॉर्टही पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

मोठी बातमी - कोविड 19 जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र पथक; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं स्पष्टीकरण.. 

दरम्यान, संबंधीत ट्वीटर अकाउंट फार ऍक्टिव्ह असून दररोज अनेक ट्वीट त्यावरून करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

(संकलन - सुमित बागुल ) 

mumbai police takes action against derogatory tweets against cm thackeray and various other ministers

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai police takes action against derogatory tweets against cm thackeray