मुंबईला पुन्हा २६/११ चा धोका; धमकी देणारा लाहोरचा इम्तियाज; पोलिसांची माहिती

Gate-Way-of-India
Gate-Way-of-IndiaSakal

गणपतीचा उत्सव तोंडावर आलेला असतानाच मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट पसरलं आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एका पाकिस्तानी क्रमांकावरुन दहशतवादी हल्ल्याची धमकी आली आहे. २६/११ सारखाच भयंकर हा हल्लाही असेल, असं या धमकीत लिहिलं आहे. याविषयीच आता मुंबई पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे.

Gate-Way-of-India
Mumbai: "पुन्हा २६/११!"; पोलिसांना आलेल्या धमकीच्या मेसेजने खळबळ

मुंबई पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या धमकीबद्दल सविस्तर सांगितलं आहे. तसंच पोलीस सतर्क झाले आहेत, मुंबईकरांनी घाबरू नये, अशी ग्वाहीसुद्धा दिली आहे. धमकीच्या संदेशाबद्दल बोलताना फणसळकर म्हणाले की, मुंबईच्या वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला ज्या पाकिस्तानी क्रमांकावरून धमकीचा संदेश आला होता त्या क्रमांकावर सुरक्षा यंत्रणांनी संपर्क साधला. तो नंबर लाहोरचा असून त्याचे नाव इम्तियाज आहे. इम्तियाजने दावा केला आहे की तो सरकारी विभागात काम करतो आणि व्यवसायाने माळी आहे.

Gate-Way-of-India
Mumbai : "मुंबई म्हणजे मलई असं फडणवीसांना वाटतंय"; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

इम्तियाजने असाही दावा केला आहे की तो स्मार्टफोन वापरत नाही, तो कीपॅडसह फोन वापरतो, त्यामुळे त्याने मेसेज केला नाही. काही दिवसांपूर्वी त्याचा फोन हरवला होता, त्यामुळे या वेळी कोणीतरी त्याचा फोन आणि त्याच्या सिमचा गैरवापर केला असावा, असंही इम्तियाजने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. काल रात्री पावणे बाराच्या सुमारास कंट्रोल रुमला मेसेज आले होते. यात काही नंबर भारतातले दिसत आहेत. त्यांचा तपास सुरू आहे. तसंच गुन्हे शाखेची तीन पथकं आणि महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने हा तपास होणार आहे. त्याचबरोबर मुंबईच्या सागरी सुरक्षेतही वाढ करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com