मी पाहिलं माझ्या डोळ्यांच्या थ्रू...! मुंबई पोलिसांची Gen Z स्टाईल; नाना पाटेकर यांच्या 'क्रांतिवीर' गाण्याच्या ओळीतून केलं आवाहन

Mumbai Police: राज्यभरातील क्राइमच्या घटनांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी Gen Z स्टाईल पोस्ट केली आहे. यामध्ये 'क्रांतिवीर' गाण्याच्या ओळीतून ११२ हा टोल फ्री क्रमांक डायल करण्याचे आवाहन केले आहे.
Mumbai Police

Mumbai Police

ESakal

Updated on

मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, हाणामारी, खून, आत्महत्या, लैंगिक अत्याचार, धमक्या देणे किंवा चोरी अशा अनेक क्राइमच्या घटना घडत असल्याचे समोर येते. अशा घटनांची माहिती मिळताच पोलिसांकडून संबंधित आरोपी व्यक्तींकडून कठोर कारवाई केली जाते. मात्र दुसरीकडे अशा घटना घडल्याचे पाहता अनेक निराधार किंवा अडचणीतील नागरिकाला त्या परिस्थितीत पोलीस ठाण्यापर्यंत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे अशावेळी ११२ या टोल फ्री क्रमांक डायल करताच लगेचच पोलिसांकडून मदत मिळते. या टोल फ्री क्रमांकाबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी नाना पाटेकर यांच्या 'क्रांतिवीर' गाण्याच्या ओळीतून आवाहन केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com