Mumbai Latest news | मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून वायू प्रदूषणाने कळस गाठला आहे. त्यामुळे हवा विषारी तर झाली आहेच; पण मुंबईचाही श्वास कोंडला आहे. परिस्थिती अशी आहे की, सलग दुसऱ्या दिवशी प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या विषारी धुक्यामुळे रस्त्यांची दृश्यमानता कमी झाली आहे.
शहरातील दृश्यमानता शुक्रवारी दोन ते तीनशे मीटर इतकी कमी झाली होती; त्यामुळे जवळपासच्या गगनचुंबी इमारतीही क्वचितच दिसत होत्या. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे धुक्यामुळे शुक्रवारी दिवसभर सूर्यदेवाचे दर्शन झाले नाही.