मुंबई : पॉस्को न्यायालयाचा निकाल ;आरोपीची मागणी फेटाळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : पॉस्को न्यायालयाचा निकाल ;आरोपीची मागणी फेटाळली

मुंबई : लैंगिक शोषण केल्याच्या खटल्यात तक्रारदार पिडीत तरुणीला दुसर्यांदा साक्ष देण्यासाठी बोलविण्याची आरोपीची मागणी विशेष पॉस्को न्यायालयाने फेटाळली. वारंवार जबानी नोंदवून अल्पवयीन मुलगी मानसिक तणावात जाऊ शकते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

तक्रारदार बारा वर्षी मुलगी असून तिने सन 2019 मध्ये दंडाधिकारी न्यायालयात जबाब नोंदविला आहे. मात्र आता पुन्हा तिने न्यायालयात साक्ष देण्यासाठी हजर रहावे आणि संबंधित घटनेचा तपशील द्यावा अशी तेवीस वर्षी आरोपीने केली होती. तिने दिलेल्या जबाबावर त्याला उलटतपासणी घ्यायची होती. दोन वर्षांपूर्वी दिलेली साक्ष आणि आताची साक्ष यामध्ये विसंगती आणि तफावत असेल असा दावा त्याच्या वतीने करण्यात आला होता. आरोपीला बचाव करण्याचा अधिकार आहे, त्यामुळेच ही मागणी मान्य करावी, अशी विनंती त्याच्या वकिलांनी केली होती. यापूर्वी न्यायालयाने ही मागणी मान्य केली होती आणि आरोपीला संधी दिली होती. त्यावेळी तक्रारदार व्हिडीओ कौलद्वारे हजर झाली होती.

मात्र तेव्हा त्याचे वकिल आजारी असल्यामुळे न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे आता पुन्हा ही मागणी करण्यात आली होती.

हेही वाचा: Video: भरमैदानात 'टीम इंडिया'च्या खेळाडूला आली हाक अन्...

पॉस्को न्यायालयाने ही मागणी अमान्य केली. आरोपीला बचावाचा अधिकार असतो पण तक्रारदार अल्पवयीन मुलगी असून तिच्या मानसिकतेचा विचार ही व्हायला हवा. अन्यथा तिला या सततच्या साक्षीमुळे मानसिक ताण सहन करावा लागेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. आरोपीला यापूर्वी अशी संधी देण्यात आली होती. मात्र ती न घेता केवळ आजारी आहे असे वकिलांनी सांगितले. मात्र त्याच्या सत्यतेसाठी कोणतीही कागदपत्रे सादर केली नाही, त्यामुळे आरोपीच्या अधिकारांचा विचार करण्यात आला होता, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

सन 2016 मध्ये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली होती. सन 2018 मध्ये न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.

loading image
go to top