

Mumbai-Pune Expressway Accident
sakal
खालापूर : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रविवारी पुणे लेनवर कनेक्टिंग लिंकपासून काही अंतरावर दोन कार एकमेकांना धडकल्याने अपघात झाला. या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाले असून, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात रविवारी (ता. २४) सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट वाहतूक पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.