

One Dead After Two Vehicles Fall Into Gorge on Expressway
Esakal
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर खंडाळा बोरघाट परिसरात भीषण अपघात झालाय. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला. किलोमीटर क्रमांक ३९ जवळ एका मालवाहू कंटेनरने पुढे जाणाऱ्या टाटा टेम्पोला मागून जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. धडकेनंतर दोन्ही वाहने नियंत्रणाबाहेर गेली आणि बोरघाटातील दरीत कोसळली. या अपघातात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.