Mumbai–Pune Expressway Nightmare: Traffic Restored After 32 Hours, Fresh Jam Near Kamshet as Truck Breaks Down
esakal
मुंबई
Mumbai Pune Expressway : ३२ तासांनी सुटकेचा श्वास… अन् पुन्हा संकट! कामशेतजवळ चालक झोपेत... एक्सप्रेसवे ठप्प, ट्रक बंद पडला
Mumbai–Pune Expressway Reopens After 32 Hours, Fresh Traffic Chaos Near Kamshet Raises Safety Concerns : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर ३२ तासांनंतर वाहतूक सुरू झाली असली, तरी कामशेत परिसरात ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या लांब रांगा
Mumbai Pune Expressway Traffic: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या ३२ तासांपासून सुरू असलेल्या अडथळ्याच्या संकटातून काहीसा दिलासा मिळाला आहे. या महामार्गावर अपघातग्रस्त गॅस टँकर अखेर हटवण्यात यश आले असून, मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग वाहतुकीसाठी उघडण्यात आला आहे. मात्र, या दिलास्याला फार काळ टिकू दिले नाही. मळवली परिसरात एक ट्रक अचानक बंद पडल्याने आणि अनेक जड वाहनांच्या चालकांना थकव्यामुळे झोप लागली, त्यामुळे कामशेतजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांना तासनतास वाट पाहावी लागत असून, महामार्गावरील परिस्थिती अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही.

