

traffic chaos on Mumbai Pune Expressway
Esakal
Mumbai Pune Expressway Traffic Updates: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मंगळवारी सायंकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. खंडाळा घाटात आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलीन गॅसचा टँकर उलटला. गॅसची गळती होऊन धोका निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक रोखण्यात आली होती. यामुळे तब्बल १५ तास वाहतूक विस्कळीत झाली होती. शेकडो वाहनं वाहतूक कोंडीत अडकून पडल्यानं प्रवाशांचं प्रचंड हाल झालं.