Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरती आज दोन तासांचा विशेष ब्लॉक; वाहतुकीसाठी 'या' पर्यायी मार्गांचा करावा वापर

एक्सप्रेस वेवरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक आज म्हणजे शुक्रवारी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे
Mumbai Pune Expressway
Mumbai Pune ExpresswayEsakal

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरती प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एक्सप्रेस वेवरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक आज (शुक्रवारी) दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ वाजण्याच्या दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आज दुपारी १२ ते २ वाजण्याच्या दरम्यान या मार्गावरती प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील लोणावळ्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावरती आज ग्रँटी बसवण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे दुपारी १२ ते २ वाजेच्या वेळेत पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हीच गोष्ट लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून आज दोन तासांत ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार आहे. याच गॅन्ट्रीवर पुढच्या काळात सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत.

Mumbai Pune Expressway
Lonavala News : सलग सुट्यांमुळे ‘द्रुतगती’वर खोळंबा

या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर करडी नजर ठेवतील. त्याचबरोबर बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या, नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी मदत होईल, अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांनी यावेळी दिली आहे.

महामार्गावर घेण्यात येणाऱ्या या दोन तासांच्या विशेष ब्लॉकमुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. खंडाळ्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावरून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळवण्यात येणार आहे. वाहनचालकांना वळवण पथकर नाक्यावरून पुढे पुण्याच्या दिशेने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरुन जाता येईल, असे एमएसआरडीसीने सांगितले आहे.

Mumbai Pune Expressway
Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कार-कंटेनरचा भीषण अपघात; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ४ जण जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com