
कोकण रेल्वेवरील स्थानकांची जबाबदारी रेल्वे पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे कोकण रेल्वेवरील प्रवाशांच्या सुरक्षेत भर पडणार आहे. काही दिवसांत कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकात रत्नागिरी रेल्वे पोलिस ठाण्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. रेल्वे पोलिस ठाण्यात सध्या तीन ते चार पोलिस अधिकारी आणि ६० पोलिस कर्मचारी असतील.