वडाळा-जीटीबी नगर रेल्वे स्थानकालगत कचऱ्याचे साम्राज्य; प्रशासनाचा कानाडोळा | Mumbai railway update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Debris

वडाळा-जीटीबी नगर रेल्वे स्थानकालगत कचऱ्याचे साम्राज्य; प्रशासनाचा कानाडोळा

मुंबई : मध्य, हार्बर मार्गावरील रेल्वे परिसरात (central-harbor railway) कचऱ्याचा ढीग (Debris near wadala-GTB station) साचून राहिला असून सुद्धा मध्य रेल्वे प्रशासनाचे (central railway ignorance) याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रवाशांकडून अस्वच्छ, गलिच्छ स्थानकांबाबत समाज माध्यमावरून, स्थानक व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार (Written complaint) केली जाते. वडाळा-जीटीबी नगर दरम्यान स्थानकालगत कचऱ्याचा ढीग साचला असून देखील त्याकडे प्रशासनाकडून कानाडोळा केला जातो.

हेही वाचा: अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्राच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ

देशात 2 ऑक्टोबर 2014 पासून स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर देखील ' स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत', स्वच्छता पंधरवडा राबविला जातो. मात्र, असे असून देखील मध्य आणि हार्बर मार्गावरील स्थानक परिसर अस्वच्छ दिसून येत आहे. हार्बर मार्गावरील वडाळा-जीटीबी नगर रेल्वे स्थानकालगत रेल्वे रुळावर प्लास्टिक कचऱ्याचा ढीग जमा झाला आहे. प्लास्टिक च्या पिशव्या, थर्माकोलचे तुकडे, कागदांची रद्दीने रेल्वे रूळ झाकून गेले आहेत. वारंवार प्रकार करून देखील प्लास्टिक कचरा उचलला जात नसल्याने, कचऱ्याचा डोंगर तयार व्हायला आता वेळ लागणार नाही, अशी खोचक टीका प्रवाशांकडून केली जात आहे.

रेल्वे मार्गालगत मोठ्याप्रमाणात वस्ती उभी झाली आहे. या वस्तीचे अतिक्रमण रेल्वे रुळांशेजारी आले आहे. येथील रहिवाशांकडून या भागात कचरा फेकला जात आहे. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. मध्य रेल्वेमधील प्रशासनाची रेल्वे स्थानक स्वच्छ करण्याची मनस्थिती असेल तर ते वडाळा-जीटीबी नगर येथील परिसर तत्काळ स्वच्छ करू शकतात, असे प्रवाशांनी सांगितले.

हेही वाचा: कोविड महामारीचा मुलांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम; वाचा सविस्तर

"स्वच्छतेसाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. 2014 साली अनेक सेलेब्रिटी, राजकीय नेते, सामाजिक नेत्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला होता. मात्र, आता देशाच्या आर्थिक राजधानीकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या लोकल परिसरात कचऱ्याचा ढीग साचला आहे. पालिका, रेल्वे यांनी एकमेकांकडे बोट दाखविण्यापेक्षा संयुक्तरित्या स्वच्छतेची कामे केली पाहिजेत. तर, रेल्वे परिसर स्वच्छ करण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी पुन्हा सेलेब्रिटीन स्वच्छता दूत बनून पुढाकार घेतला पाहिजे."

- धर्मेश बराई, संस्थापक, एन्व्हार्नमेंट लाईफ

धर्मेश बराई यांनी रेल्वे परिसर, रेल्वे रूळ अस्वच्छ आहे. येथील कचरा उचलून स्वच्छता केली पाहिजे, अशी लेखी तक्रार स्थानक व्यवस्थापकाकडे 2017 साली केली होती. मात्र तब्बल चार वर्षे झाली, तरी परिस्थिती जैसे-थे आहे.

loading image
go to top