मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, पुढील ३ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain: मुंबईसह उपनगरात ​सकाळच्या सत्रात अचानक सुरू झालेल्या या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन बीएमसीकडून करण्यात आले आहे.
Mumbai Rain

Mumbai Faces Intense Rainfall, Waterlogging Risk Grows

Esakal

Updated on

Mumbai Rain News: मुंबईत सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर पुढील तीन तासांत मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. हवामान विभागाने मुंबईला 'ऑरेंज अलर्ट' जारी केलाय. सकाळी ७:०० वाजता जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, मुंबईत पुढील ३ तासांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com