

Matunga Tree Collapse
ESakal
मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. आज मुंबईतील माटुंगा आणि अंधेरी परिसरात झाड कोसळण्याच्या दोन मोठ्या दुर्घटना घडल्या. माटुंग्यात नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, अंधेरीत मात्र एका पादचाऱ्याच्या अंगावर फांदी पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.