
गेल्या आठवड्याभरात राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसाने अनेक भागात पाणी साचलं होतं. रस्ते, रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले होते. यामुळे लोकलसेवाही कोलमडली होती. मुंबईकरांनी पाण्यातून वाट काढत सुरक्षित ठिकाण गाठलं. दरम्यान, आता बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी पाण्यातून चाललेल्या मुंबईकरांना ७२ तासात वैद्यकीय सल्ला घेण्याचं आवाहन केलंय. पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चाललेल्या व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.