
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मुसळधार पावसात एक धक्कादायक घटना घडली. तांत्रिक कारणांमुळे भक्ती पार्क आणि म्हैसूर कॉलनीमधील पुलाच्या मध्यभागी एक मोनो-रेल थांबली. अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी रवाना झाली. यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेत अनेक प्रवाशांना त्रास झाला आहे. तर एक जण बेशुद्ध पडल्याचे समोर आले आहे. काच फोडून बचावकार्य केले आहे.