
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात सततच्या पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. आर्थिक राजधानी मुंबईत सखल भागात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. परिस्थिती लक्षात घेता, आज दुपारी १२ नंतर शिफ्टमध्ये सुरू असलेल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने मुंबईसह कोकणातील अनेक जिल्ह्यांसाठी दोन दिवसांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात पोलिसांचे कौतुक होत आहे.