पहाटेपासून धुव्वाधर कोसळणाऱ्या पावसामुळे आज सकाळपासून मिठी नदीचे पाणी लगतच्या कुर्ला, कमानी, क्रांती नगर, तकीयवार्ड, शिक्षक नगर, कुर्ला डेपो, टॅक्सीमन कॉलनी परिसरातील घरात शिरले. त्यामुळे अदानी इलेक्ट्रिने खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी आठ वाजल्यापासून वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे एकीकडे घरात पाणी आणि काळोख झाल्याने झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांचे आज प्रचंड हाल झाले.