
मुंबईत सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकल ट्रेन आणि मोनो रेलच्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.मंगळवारी रात्रीपर्यंत लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत होती. दरम्यान आठ तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली मात्र, उपनगरात पावसाचा जोर कायम असून बुधवारी सकाळीही लोकल ट्रेन्सचा खोळंबा झाला आहे. हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे उशिरा धावत आहेत तर मध्य रेल्वेवरील लोकल अर्धा तास उशिरा धावत आहेत, तर काही लोकल रद्द करण्त आल्या आहेत. यामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली आहे.