
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई झालीय. गेल्या ७० वर्षांचा विक्रम मोडत मान्सून मुंबईत दाखल झाला. मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं आहे. मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीची माहिती पत्रकार परिषदेत दिली.