esakal | मुंबईकर, पुढचे २४ तास सावध राहा; हवामान खात्याचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकर, पुढचे २४ तास सावध राहा; हवामान खात्याचा इशारा

मुंबई हवामान विभागानं येत्या 24 तासांत कोकण पट्यात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे.

मुंबईकर, पुढचे २४ तास सावध राहा; हवामान खात्याचा इशारा

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः मुंबई हवामान विभागानं येत्या 24 तासांत कोकण पट्यात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे.  बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. बाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांना आजही अतिवृष्टीचा सामना करावा लागणार आहे. तसंच बुधवारी आणि गुरुवारीही अतिवृष्टी ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. 

गुरुवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यत अतिवृष्टी, मुंबईत मुसळधार, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर  पुणे वेधशाळेने येत्या 72 तासात कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. 

हेही वाचाः  महाड शहरात पूरस्थिती; सावित्री नदीच्या पुराचं पाणी शहरात, नागरिकांमध्ये घबराट

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाचवेळी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पाऊस पुन्हा परतला आहे. सध्या मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर असला तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा फारसा जोर नाही, त्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त आहे.

सर्वाधिक पावसाची नोंद 

गेल्या १२ तासात मुंबई शहरात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.  सोमवारी आणि मंगळवारी पडलेल्या पावसानं पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक केलाय.  सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगरात सुमारे ३०० मि.मी. पावसाची नोंद झाली असून मुंबईत आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाच्या 81% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या १० वर्षातील ऑगस्ट महिन्यात नोंद झालेला दुसऱ्या क्रमांकाचा हा सर्वाधिक पाऊस आहे. सततच्या पावसामुळे मुंबईतील सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे.

अधिक वाचाः  Mumbai Rain Updates: मुंबईसह उपनगरात रेड अलर्ट जारी, पालघरमध्ये NDRFची टीम तैनात

पालघर तालुक्यासह डहाणू, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांमध्ये आज पहाटेपासून ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणीच्या रहिवासी भागात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पावसाचं रौद्ररुप पाहता एनडीआरएफची एक टीम पालघरला रवाना झाली आहे.

mumbai rains latest updates heavy rain continue city imd issue red alert

loading image