
मुंबई : कोरोना विषाणूला संपवू शकेल, अशी लस अद्याप तयार झालेली नाही. परंतु, जुनीच प्लाझ्मा उपचारपद्धती परिणामकारक ठरत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने या आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. आता फक्त कोरोनामुक्त झालेल्यांना यासाठी रक्तदान करायची आवश्यकता आहे.
कोरोनाची बाधा रोखण्यासाठी कोणतीही लस नसली, तरी माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती या विषाणूला वरचढ ठरत आहे. रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावरच रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे आता प्लाझ्मा थेरपी म्हणजे रक्तद्रव उपचार पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. भारतात केरळमध्ये हा प्रयोग करण्यात येणार असून, केंद्र सरकारनेही मान्यता दिली आहे. चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया आदी देशांतही प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरली आहे.
या उपचारपद्धतीत कोरोनामुक्त व्यक्तींच्या रक्तातील प्लाझ्मा रुग्णाला दिला जाईल. असे उपचार फक्त अत्यवस्थ रुग्णांवर केले जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार आजारातून बरे झालेल्या व्यक्तींना रक्तदान करण्याचे आवाहन करत आहोत. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या निर्देशांनुसार पुढील निर्णय घेण्यात येतील, असे महापालिकेच्या उप आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.
नक्की काय होते?
Mumbai ready to fight with Corona with this therapy
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.