कल्‍याण, डोंबिवलीत धोका वाढला; संसर्गाचे हॉटस्पॉट घोषित

संग्रहित
संग्रहित
Updated on

कल्‍याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर केडीएमसी प्रशासन समाजमाध्यमांद्वारे नागरिकांशी संवाद साधत आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रविवारी शहरातील कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून सुमारे १० परिसरांची नावे जाहीर केली.

डोंबिवली पूर्वेतील म्हात्रेनगर, आयरेगाव, तुकारामनगर, छेडा रोड, डोंबिवली पश्‍चिमेतील टेलकोसवाडी, रेतीबंदर रोड, कल्याण पूर्वेतील भगवाननगर, चिंचपाडा, कल्याण पश्‍चिमेतील वायलेनगर, खडकपाडा या परिसरात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्‍ण आढळले आहेत. त्‍यामुळे हे परिसर हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

शहरातील कोरोनाबाधित एकूण रुग्णसंख्या ७३ झाली असून त्यातील ४९ रुग्ण हे डोंबिवलीतील आहेत; तर २६ रुग्ण हे उपचारानंतर बरे झाल्याचे त्‍यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांत सापडलेले १२  रुग्ण हे कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आले असून पालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात संशयित म्हणून त्यांची तपासणी करण्‍यात आली.

या परिसरात आढळले रुग्ण
आतापर्यंत आढळलेले ७३ रुग्ण हे गांधारी, टिटवाळा गणेश मंदिर, शहाड, फ्लॉवर व्हॅली, चिकणघर गावठाण, गरिबाचा वाडा, गावदेवी मंदिर नवागाव, ठाकूरवाडी, कोपर गाव, म्हात्रेनगर, सारस्वत कॉलनी, अंबिकानगर, तुकारामनगर, नेहरूनगर, जाई बाई विद्यामंदिर, विजयनगर, तिसगाव गावठाण, सागाव, सोनारपाडा या परिसरातील आहेत.

ठाणे जिल्ह्यात ३६ नवे रुग्ण
ठाणे :  ठाणे शहरात २१, मीरा-भाईंदरमध्ये १३ आणि कल्याण-डोंबिवलीत दोन अशा ३६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ३८९ वर पोहोचली असून आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात रविवारी पालिकेच्या हद्दीत एकाच दिवशी २१ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून कोरोनाबाधितांची संख्या १४० वर पोहोचली आहे. तसेच मीरा-भाईंदरमध्ये १३ नवीन रुग्ण आढळून आल्याने ८२ इतकी संख्या झाली आहे; तर कल्याण-डोंबिवली क्षेत्रात दोन नवीन रुग्णांची नोंद केल्यामुळे तेथील रुग्णांचा आकडा ७५ वर पोहोचला आहे.

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com