esakal | मुंबई : मार्शलची वसुली थांबणार; विनामास्क वाल्यांकडून ऑनलाईन दंड
sakal

बोलून बातमी शोधा

corona mask

मुंबई : मार्शलची वसुली थांबणार; विनामास्क वाल्यांकडून ऑनलाईन दंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणार्यांकडून तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणार्यांकडून रोख दंड वसूल करण्याचे करण्याचे क्लिनअप मार्शलचे अधिकार रद्द केले जाणार आहे. यासाठी महापालिका मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्याचा विचार करत आहे.नियम मोडणार्या वाहानांवर ज्या पध्दतीने कारवाई केली जाते त्याच पध्दतीने ही कारवाई होणार आहे.

कोविड काळात सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क लावणे बंधनकारक आहे.मास्क न लावणार्याकडून 200 रुपयांचा दंड वसुल केला जातो.ही कारवाई करण्यासाठी महापालिकेने 700 हून अधिक खासगी क्लिन अप मार्शल नियुक्त केले आहेत.मात्र,हे मार्शल आता गैरप्रकार करत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.त्याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी घन कचरा विभागाच्या अधिकार्यांची बैठक घेतली.या बैठकित हा पर्याय पुढे आला आहे आहे.

हेही वाचा: "शेतकऱ्यांना चिरडणारे वाहन आपलेच पण..."; केंद्रीय मंत्र्याची कबुली

विनामास्क फिरणाऱ्यांकडून आता रोख 200 रुपये दंड न घेता ऑनलाइन दंड घेतला जाणार आहे. या दंडाची रीतसर पावतीही संबंधित नियम मोडणाऱ्याला त्याच्या 'विनामास्क फोटोसह' मोबाईलवर पाठवली जाणार आहे. नियम मोडणार्या वाहानांना दंडाचा मेसेज जातो त्याच धर्तीवर हे अँप विकसित केले जात असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कारवाईचा आराखडा ठरवणार

क्लीनअप मार्शल विनामास्क नागरिकाचा फोटो काढेल. हा फोटो संबंधिताला दाखवून मोबाईलवरही पाठवला जाईल. शिवाय दंडाची पावतीही मोबाईलवर पाठवली जाईल. हे अँप सध्या विकसित केले जात असून दंड किती दिवसांत भरावा, दंड भरला नाही तर कशी कारवाई करायची याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. यामध्ये क्लीनअप मार्शलला त्याचे ठिकाण निश्चित करून दिला जाईल. त्यामुळे तो आपल्या कार्यक्षेत्राबाहेर बेकायदेशीररित्या कारवाई करू शकणार नाही.

loading image
go to top