मुंबईत समुद्रात अडकलेल्या जहाजात चोरीसाठी गेले, ४ जणांचा मृत्यू; एकाला जखमी अवस्थेत काढलं बाहेर, काय घडलं?

Mumbai News गोराई मनोरी परिसरात एक परदेशी जहाज अडकलं आहे. या जहाजावर चोरीच्या उद्देशाने गेलेल्या चौघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
Mumbai Ship Theft Attempt Leaves Four Dead, One Injured

Mumbai Ship Theft Attempt Leaves Four Dead, One Injured

Esakal

Updated on: 

मुंबईत एका परदेशी जहाजावर चोरी करायला जाणं चौघांच्या जीवावर बेतलंय. जहाजाच्या आत पाईप कापताना गॅस गळती होऊन चौघांचा मृत्यू झाला आहे. गॅस गळतीमुळे गुदमरले असावेत किंवा स्फोटासारखी घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. गोराई मनोरी परिसरात एक परदेशी जहाज अडकलं आहे. यावर घडलेल्या घटनेची माहिती मिळताच गोराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com