मुंबई : लघू उद्योगाला मदत करण्यासाठी सिडबी आणि गुगल एकत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

मुंबई : लघू उद्योगाला मदत करण्यासाठी सिडबी आणि गुगल एकत्र

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या वित्तपुरवठा आणि विकासासाठी काम करत असलेली भारतीय लघु उद्योग विकास बँक (सिडबी) ने गूगल सोबत करार केला आहे. या माध्यमातून या उद्योगांसाठी स्पर्धात्मक व्याजदरावर 100 लाखापर्यंतचे आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.

हेही वाचा: सौंदर्यखणी : ‘मिथिला कनेक्शन’ असलेली ‘मधुबनी’

कोविड काळात अर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या MSME क्षेत्राला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. या अंतर्गत सूक्ष्म उद्योगांसाठी 110 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध होणार आहे. 5 कोटी पर्यंत उलाढाल असलेल्या सूक्ष्म उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करण्याची योडना आहे. सिडबी च्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कर्जाचा आकार अडीच लाखापासून 1 कोटीपर्यंत असणार आहे. महिला उद्योजकांद्वारे चालवले जाणारे उद्योगांना प्राधान्य दिले जाणार आहे.

loading image
go to top