मुंबईच्या सिद्धिविनायकमध्ये चौपट भाविक; दर तासाला 800 गणेशभक्त घेणार दर्शन

मुंबईच्या सिद्धिविनायकमध्ये चौपट भाविक; दर तासाला 800 गणेशभक्त घेणार दर्शन

मुंबई: नववर्ष स्वागताचे निमित्तसाधून प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात रोजच्यापेक्षा सुमारे चौपट म्हणजे दर तासाला 800 भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. मंदिराला विशेष सजावट करण्यात आली असून महालक्ष्मी तसेच मुंबादेवी मंदिरे देखील भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. 

नववर्ष इंग्रजी असले तरी यानिमित्ताने वर्षाची सुरुवात भक्तीभावाने व्हावी आणि सर्व चांगले होण्यासाठी देवांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून अनेक भाविक वर्षाच्या पहिल्या दिवशी मंदिरात आवर्जून जातात. त्यांच्या स्वागतासाठी मुंबईतील प्रमुख मंदिरे सज्ज झाली असून मंदिरांना विशेष सजावट, विशेष पूजा अशा प्रसन्न वातावरणात भाविकांचे स्वागत केले जाणार आहे. 

सिद्धिविनायक मंदिरात एरवी दर तासाला 250 भाविकांना प्रवेश दिला जातो. सध्या त्यांचे एकच प्रवेशद्वार खुले आहे. मात्र उद्यापासून रिद्धी सिद्धी ही दोनही प्रवेशद्वारे खुली करून दर तासाला 800 भाविकांना प्रवेश दिला जाईल, असे मंदिर व्यवस्थापनाच्या प्रियंका छापवाले यांनी सकाळला सांगितले. नववर्षानिमित्त वेगळी पूजा नसते पण मंदिरात पुष्पमाळा, दिव्यांच्या माळा आदी सजावट केली जाईल. सध्याही भाविकांना विनासायास प्रवेश मिळत असून उद्यापासून महिनाभर दरताशी 800 भाविकांना प्रवेश दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मुंबादेवी मंदिरात नववर्षानिमित्त देवीची विशेष पूजा होईल. अर्धा तास चालणाऱ्या या पुजेदरम्यान दर्शनही विनाव्यत्यय सुरु राहील, असे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी सांगितले. उद्या जेवढे भाविक येतील तेवढ्यांना दर्शन मिळेल याची व्यवस्था केली आहे. मात्र अद्यापही सरकारच्या निर्देशांनुसार मंदिरात प्रसाद, फुले, नारळ, पेढे आदी नेण्यास मनाई आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा- "मुंबईत रात्री ११:०० नंतर पार्टी संपवू नका", मुंबई महापालिकेने दिली मोठी खुशखबर
महालक्ष्मी मंदिरातदेखील ऑनलाईन दर्शनपासची व्यवस्था नाही. पण सरकारी निर्बंधांनुसार गाभाऱ्याच्या बाहेरूनच भाविकांना दर्शन घेता येते. अद्यापही कोरोनाचे सावट असल्याने नववर्षाचे स्वागतही साधेपणाने आणि सरकारी निर्बंध पाळून केले जाईल. नववर्षाची वेगळी पूजा नाही, अगदी कोणा भाविकाने चुकून पुरोहितांना फुले-नारळ देऊ नये म्हणून गाभाऱ्यात एकच पुरोहित तैनात आहे. उद्याही जास्त भाविक आले तरीही रांगेतील सर्वांनाच दर्शन मिळेल, असे व्यवस्थापक शरदचंद्र पाध्ये म्हणाले.
------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Siddhivinayak Temple authorities increased number devotees 800 per hour

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com