सिद्धू मुसेवला हत्या प्रकरणी कुख्यात गुंड आरोपी दीपक टिणूची मैत्रिण अटकेत

सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी आरोपी कुख्यात गुंड दीपक कुमार उर्फ टिणू यांच्या मैत्रिणीला मुंबई विमानतळावर अटक रविवारी रात्री पंजाब पोलिसांकडून अटक करण्यात आली.
Crime
CrimeSakal
Summary

सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी आरोपी कुख्यात गुंड दीपक कुमार उर्फ टिणू यांच्या मैत्रिणीला मुंबई विमानतळावर अटक रविवारी रात्री पंजाब पोलिसांकडून अटक करण्यात आली.

मुंबई - सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी आरोपी कुख्यात गुंड दीपक कुमार उर्फ टिणू यांच्या मैत्रिणीला मुंबई विमानतळावर अटक रविवारी रात्री पंजाब पोलिसांकडून अटक करण्यात आली. आरोपी लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असलेला गँगस्टर दीपक कुमार उर्फ ​​टिनू पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी दीपक टिनूच्या मैत्रिणीला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. भारतातून मालदीवमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना दिपकच्या प्रेयसीला पंजाब पोलिसांच्या पथकाकडून ताब्यात घेण्यात आले. पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी मुलीच्या अटकेची माहिती प्रसिद्ध केली आहे.

पंजाब पोलिसांचा दावा आहे की, पकडलेल्या मुलीने गुंड टिनूला पळून जाण्यास मदत केली होती. तसेच इतर आरोपींना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, आरोपी दीपक टिनू भारतात आहे की अन्य कोणत्या देशात आहे ह्याचा पोलिस शोध घेत आहेत.

कोण आहे गँगस्टर दीपक टिनू

दीपक टिनू हरियाणाच्या हिसारमधील रहिवासी आहे. नवी दिल्लीत झालेल्या गोळीबारामुळे सर्वप्रथम मोहाली पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली. नंतर हरियाणातील एका गावात, नंतर पंचकुला आणि आता मानसा येथे पोलिसांच्या रडारवर दिपक आहे. दीपक अनेकदा खुनाचे व्हिडिओ दाखवून लोकांमध्ये दहशत पसरवत असे. या वर्षी 1 ऑक्टोबर रोजी गुंड दीपक कुमार उर्फ ​​टिनू चौथ्यांदा पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता.टिनूने यापूर्वी चार वेळा पोलिसांच्या हातावर तुरी दिल्यानेही आश्चर्य व्यक्त होत आहे.

टीनू लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य होता आणि सिद्धू मुसेवाला हत्याकांडात पोलीस त्याला चौकशीसाठी ताब्यात घेत होते. कपूरथला तुरुंगात गँगस्टर दीपक शिक्षा भोगत होता. मूसवाला खून प्रकरणाच्या नियोजनातील शेवटचा फोनवरील संभाषण 27 मे रोजी लॉरेन्स आणि टिनू यांच्यात झाले होता आणि सिद्धू मूसवाला यांची 29 मे रोजी हत्या झाली होती.दीपकवर पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीसह विविध राज्यांमध्ये 34 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि खंडणीचे आरोप आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com