स्मार्टफोन चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश; 800 मोबाईल आणि 21 आरोपी अटकेत

एका महिन्याच्या कालावधीत, मुंबई पोलिसांनी स्मार्टफोन चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
Crime News
Crime Newssakal
Summary

एका महिन्याच्या कालावधीत, मुंबई पोलिसांनी स्मार्टफोन चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

मुंबई - एका महिन्याच्या कालावधीत, मुंबई पोलिसांनी स्मार्टफोन चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या एका महिन्याच्या कालावधीत पोलिसांच्या कारवाईत 800 मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले असून 21 जणांना अटक केली. पोलिसांच्या तपासात महागडे चोरीचे स्मार्टफोन नेपाळ आणि बांगलादेशात तस्करी केले जात होते तर जुने फोन देशाच्या विविध भागांमध्ये विकण्यासाठी पाठवले जात होते.

पोलिसांची कारवाई

जून 2022 मध्ये, गुन्हे शाखेला माहिती मिळाली की मानखुर्दमधील महाराष्ट्र नगरमधील रहिवासी चोरीला गेलेले किंवा हरवलेला स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहे. गुन्हे शाखेकडून पडताळणी करण्यासाठी आणि गुन्हेगारांची कार्यपद्धती तपासण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली. 15 जुलै रोजी टीमने मानखुर्द येथील एका घरावर छापा टाकून 41 आयफोनसह 490 स्मार्टफोन जप्त केले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी मेहबूब खान (37) आणि फियाज अकबर शेख (31) या दोन आरोपींनाही अटक केली. गुन्हे शाखेने 12 ऑगस्ट रोजी नागपाडा येथे आणखी एका ठिकाणी छापा टाकून 135 फोन जप्त केले.छापा टाकल्यानंतर लगेचच मानखुर्द पोलिसांनी 21 जुलै रोजी एका व्यक्तीला अटक केली आणि आणखी एका रॅकेटची माहिती पोलिसांच्या हाती लागली.

मुख्य आरोपी अटकेत

पोलिसांना माहिती मिळताच कारवाई करत पोलिसांनी 78 मोबाईल फोन जप्त केले असून या प्रकरणात सात जणांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांनी मोबाईल रिसिव्हर म्हणून काम केले तर इतरांनी स्नॅचिंग करण्याचे काम केल्याची माहिती तपासात समोर आली. या रॅकेटचा मुख्य आरोपी अश्फाक अहमद अब्दुल अजीज शेख (२९) हा शिवाजी नगर येथील रहिवासी आहे. एका मदरशात शिक्षक होता पण प्रत्यक्षात तो चोरीला गेलेला फोन जमा करण्यात आणि नंतर ते तस्करी करण्यात प्रमुख होता. तो नेपाळ आणि बांगलादेशला त्याच्या संबंधितांच्या संपर्कांद्वारे फोन तस्करी करत होता.बसमधून फोन चोरी करणे किंवा दुचाकीवरून येऊन मोबाईल हिसकावून पसार होणे ही रॅकेटची कार्यपद्धती आहे. बहुतेक स्नॅचर्स मानखुर्द किंवा गोवंडीतील आहेत त्यामुळे या भागात रिसिव्हर्सची संख्याही लक्षणीय आहे

ट्रॉम्बे मध्ये कारवाई

आणखी एका कारवाईत, 8 ऑगस्ट रोजी, ट्रॉम्बे पोलिसांनी 72 फोन तसेच सुटे भाग जप्त केले आणि दोघांना पकडले. आणखी अटक होण्याची शक्यता आहे. चोरीचे फोन मानखुर्द आणि शिवाजी नगरमधील रिसीव्हर्सद्वारे गोळा केले जात होते आणि कुरिअरद्वारे कोलकाता किंवा ईशान्य भागातील राज्यांमध्ये पाठवले जात होते तेथून सीमा ओलांडून मोबाईल फोन्सची बांग्लादेशात तस्करी केली जात होती. अशा फोनसाठी बांगलादेश ही मोठी बाजारपेठ असल्याचे तपासात माहिती मिळाली. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com