

Mumbai Smog Video Goes Viral Pollution Not Fog Causes Alarm
Esakal
राज्यात सध्या हवामानात सातत्याने बदल होत असून पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याचं चित्र आहे. गेल्या आठवडाभरात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. त्यानंतर तापमानात अचानक चढ-उतार पाहायला मिळाले. हवामान विभागाच्या माहितीनुसार वातावरण ढगाळ राहिल्याने थंडीची तीव्रता कमी झाली आहे. दरम्यान, मुंबईत हवामानासोबतच हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.