मुंबई : झोपडपट्टी मुक्तीसाठी अजब फंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bmc

मुंबई : झोपडपट्टी मुक्तीसाठी अजब फंडा

मुंबई : सरकारी यंत्रणांकडून अनेक दशकांपासून प्रयत्न केला जात असून मुंबई झोपडपट्टी मुक्त होत नसल्याने आता अनोखा पर्याय पुढे आला आहे.त्यामुळे आता महानगर पालिका,जिल्हाधिकारी,म्हाडा प्राधिकरणानी त्यांच्या मालकीच्या भुखंडावर पक्की घरे उभारून तेथे झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करावे.अशी ठरावाची सुचना महानगर पालिकेच्या महासभेत मांडण्यात आली आहे.

भाजपच्या आसावरील पाटील यांनी ही ठरावाची सुचना मांडली आहे.म्हाडा,महानगर पालिकेच्या भुखंडावर असंख्य झोपड्ड्या अस्तीत्वात आहेत.सागरी किनारी संरक्षण क्षेत्र,लहान भुखंड तसेच अनेक कारणांमुळे झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास होऊ शकलेला नाही.प्रत्येक झोपडीधारकाला पक्के घर मिळावे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे.मात्र,सध्याच्या ज्या वेगाने पुनर्विकासाचे काम सुरु आहे त्या वेगाने मुंबई झोपडपट्टी मुक्त होणे अवघडच आहे. त्यामुळे म्हाडा, जिल्हाधिकारी आणि महानगर पालिकेने त्यांच्या कडे उपलब्ध जागेवर 300 चौरस फुटांची पक्की घरे बांधून त्यात झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करावे अशी ठरावाची सुचना पाटील यांनी मांडली आहे. या ठरावाच्या सुचनेवर या महिन्याच्या महासभेच्या कामकाजात निर्णय होणार आहे.

हेही वाचा: BMC : दोन महिन्यात ठरावाच्या सुचनेवर निर्णय नाही

झोपडपट्ट्यांची काय परीस्थीती

- झोपड्यांची संख्या - 15 ते 16 लाख

- लोकसंख्या -सुमारे 50 लाख ( एकूण लोकसंख्येच्या 42टक्के)

- झोपड्यांचे क्‍लस्टर - 2,397

क्षेत्रफळ - 8,171 एकर

1995 पासून 2020 पर्यंत पुनर्वसनाची स्थीती

- प्रकल्प - 1993

- पुनर्वसन झालेले कुटूंब - 2 लाख 16 हजार 016

loading image
go to top